dr.satish best web design developer for mac

हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत :

गडहिंग्लज तालुक्याच्या अग्नेयेला असलेले डोंगरराजींच्या कुशीत वसलेले तसेच कर्नाटक – महाराष्ट्राचा दुभाजक असलेले एक छानसं टुमदार गाव म्हणजे हेब्बाळ जलद्याळ. संत गाडगेबाबा स्वच्छता अभियानात सहभागी झालेले व पुरस्कार मिळवलेले गाव आहे. या गावाचे वैशिष्ट्य म्हणजे या गावाला लाभलेले आतापर्यंतचे सरपंच. 1957 साली पहिल्यांदा या गावात ग्रामपंचायत अस्तित्वात आली. या गावाचे पहिले सरपंच म्हणून मा.कै.सुबराव भागोजी पाटील यांची निवड झाली. व गावाला एक वेगळेच स्वरूप प्राप्त झाले. गावात निरनिराळ्या विकासाच्या योजना आल्या. याच्या माध्यमातून ग्रामपंचायतीने गावात विकासाला सुरुवात केली ती आजतागायत सुरु आहे. गावाच्या ग्रामपंचायतीला आजपर्यंत विविध पुरस्कार मिळाले आहेत. गावामध्ये शिक्षणाची सोयही चांगली आहे, तसेच सन 2016-2017 तालूक्यात प्रथम I.S.O.मानांकित अंगणवाडी म्हणून क्र 91 ठरली आहे.

ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत ही 1957 सालापासून कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो. आमच्या गावातील कुटुंबांची संख्या 489 असून गावाची लोकसंख्या 1653 इतकी आहे.ती 3 वॅार्ड मध्ये विभागली गेली आहे.

सरपंच
श्री. अरविंद शंकर दावणे

गावाला रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण इ. पायाभूत सुविधा देऊन गावाचा विकास करण्यासाठी मी प्रयत्न करतो.

उपसरपंच
सौ. सुनिता रविंद्र कांबळे

गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन आपल्या गावाचा विकास करण्यासाठी माझा प्रयत्न असतो.

ग्रामसेवक
श्री. सुरेश राजाराम गुरव

गावामध्ये सुव्यवस्था राखणे, विविध सरकारी योजनांबद्दल माहिती देण्याचा माझा प्रयत्न असतो.

आपली समस्या,विचार व विकास मांडा.

आम्ही 'ज्ञानग्रुप' आपली समस्या किंवा विचार थेट जिल्हा परिषद कोल्हापूर पर्यंत पोचवु...!

Gadhinglaj City- Kolhapur Maharashtra

ADDRESS
HEBBAL JALDYAL Grampanchayat
A/p HEBBAL JALDYAL Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone :7588940733

Office : 02327 – 239165