dr.satish responsive layout developer

गावातील विविध सुविधा

शैक्षणिक सुविधा :

आमच्या गावात तीन अंगणवाडी, एक प्राथमिक शाळा, एक माध्यमिक शाळा व एक उच्च माध्यमिक आशा सर्व स्तरावरील शिक्षणाची सोय उपलब्ध आहे. त्यामुळे गावातील मुलांना बाहेर जावे लागत नाही. अगदी अंगणवाडी पासून माध्यमिक शिक्षणाची सोय एकाच छताखाली उपलब्ध आहे. गावातील शाळा ही आकाराने मोठी आहे, तसेच येथील शाळेला सन 2015-16 ला  तालुक्यात प्रथम क्रमांकाचे “स्वच्छ सुंदर हिरवी शाळा” हा  पुरस्कार मिळाला आहे. सन 2016-2017 तालूक्यात प्रथम I.S.O.मानांकित अंगणवाडी म्हणून क्र 91 ठरली आहे.
अंगणवाडी      :  अंगणवाडी क्र.90, 91, 225
प्राथमिक शाळा  :  विद्यामंदिर हेब्बाळ-जलद्याळ.
माध्यमिक शाळा :  न्यू इंग्लिश स्कूल हेब्बाळ-जलद्याळ.
उच्च माध्यमिक :  भावेश्वरी कला व वाणिज्य महाविद्यालय हेब्बाळ-जलद्याळ.

दुध संस्था :

गावातील लोक शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धउत्पादन हा व्यवसाय करतात. गावात दुध संस्था दोन आहेत. येथील लोक दुध उत्पादनाच्या माध्यमातून आपले उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न करतात. गावातील लोकसंख्या जास्त असल्यामुळे या दुध संस्थेत सभासद संख्या जास्त आहे.

दूध संस्था व त्यांची नावे -

 • श्री. भावेश्वरी सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या. हेब्बाळ-जलद्याळ.
 • श्रीकृष्ण सहकारी दुध उत्पादक संस्था मर्या. हेब्बाळ-जलद्याळ.

आरोग्य सुविधा :

गावातील नागरिकांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी गावात दोन खाजगी दवाखाने आहेत. व त्याचबरोबर प्राथमिक रुग्णालय  मुंगुरवाडी व नेसरी  येथे असल्यामुळे गावाला आरोग्यविषयक फारश्या अडचणी येत नाहीत. तसेच गावात स्वच्छता असल्यामुळे गावात रोगराई पसरत नाही. सध्याच आमच्या गावाचा संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जिल्ह्यात प्रथम क्रमांकाचे पारितोषिक सन 2015-16 मध्ये मिळाले. 

महिला बचत गट :

गावातील पुरुषांच्या बरोबर आज महिलाही काम करताना दिसतात. गावातील बचत गटाच्या माध्यमातून महिलांना रोजगार मिळाला आहे. गावात एकूण आठ महिला बचत गट आहेत. या बचत गटाच्या माध्यमातून महिला पुढे येत आहेत. बचत गटातून महिलांना व्यवसाय सुरु करण्यासाठी कर्ज स्वरुपात मदत मिळते आहे. व यातून महिला आपला व आपल्या कुटुंबाचा कारभार पाहतात.

महिला बचत गट व त्यांची नावे -

 

 • उत्कर्ष महिला बचत गट
 • आराधना महिला बचत गट
 • कल्पना चावला महिला बचत गट
 • गृहलक्ष्मी महिला बचत गट
 • लक्ष्मी महिला बचत गट
 • सखी महिला बचत गट
 • ओमकार महिला बचत गट
 • यशोधरा महिला बचत गट

तरूण मंडळे :

गावातील तरुण मुलांच्या शक्तीचा गावाच्या विकासासाठी मदत व्हावी यासाठी गावात तरुण मंडळांची स्थापना करण्यात आली आहे.

तरूण मंडळ व त्यांची नावे -
 • न्यू स्टार तरुण मंडळ 
 • शिवशक्ती क्रीडा मंडळ 
 • आदर्श कला व क्रीडा मंडळ 
 • उमाजी नाईक तरुण मंडळ 
 • भिमज्योत कला व क्रीडा मंडळ
 • छत्रपती शिवाजी कला व क्रिडा मंडळ
 • शिवाजी चौक तरुण मंडळ

वाचनालय :     

गावातील मुलांना वाचनाची सवय लागावी व तसेच त्यांच्या ज्ञानात भर पडावी यासाठी गावात एक वाचनालय आहे. वाचनालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारची पुस्तके उपलब्ध आहेत. तसेच तरुण मुलांच्यासाठी स्पर्धापरीक्षेसाठी उपयोगी पडणारी विवध लेखकांची पुस्तके उपलब्ध आहेत.

 • श्री.भावेश्वरी वाचनालय 

वित्तिय संस्था :
गावातील लोकांना बचतीची सवय लागावी म्हणून गावात एक विकास सोसायटी स्थापन करण्यात आली आहे. या विकास सोसायटीमुळे गावातील लोक मोठ्या प्रमाणात बचत करू लागले. व यामुळे त्यांची परिस्थिती सुधारण्यास मदत झाली. तसेच गावात बँक ऑफ इंडिया या बँकेची शाखादेखील आहे. येथे या बँकेची शाखा असल्यामुळे हेब्बाळ तसेच तेथील आजूबाजूच्या लोकांना बँकेचा उपयोग झाला. त्यासाठी नेसरी किंवा गडहिंग्लज येथे जावे लागत नाही.

वित्तिय संस्थाचे नाव :  

 • नवभारत वि.का.स.(विकास) सेवा संस्था मर्या. हेब्बाळ-जलद्याळ 

 
बँकेचे नाव :

 • बँक ऑफ इंडिया

ADDRESS
HEBBAL JALDYAL Grampanchayat
A/p HEBBAL JALDYAL Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone :7588940733

Office : 02327 – 239165