dr.satish best website design developer

हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत कार्यप्रणाली :

हेब्बाळ जलद्याळ ग्रामपंचायत ही 1957 सालापासून  कार्यरत असून सदस्य संख्या नऊ आहे. सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक ह्यांच्या मदतीने ग्रामपंचायतीचा कारभार पाहिला जातो.

सरपंचाची कामे -

 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • गावातील तंटे निर्विवाद मिटवणे.
 • गावाची स्वच्छता राखणे.
 • वेळोवेळी ग्रामसभा घेणे. (एका वर्षातून किमान 4 ग्रामसभा घेणे हे ग्रामपंचायत अधिनियम कायदयाअंतर्गत बंधनकारक आहे)
 • गावात आवास करत असल्या बाबतचा दाखला देणे (रहिवासी दाखला) इ.

सदस्यांची कामे -

 • सदस्यांनी आप-आपल्या वार्डाकडे नियमित लक्ष दयावे.
 • वार्डातील समस्या आपल्या पध्दतीने सोडवाव्यात.
 • गावातील लोकांमध्ये बंधू भाव निर्माण करुन गावाचा विकास करणे.
 • वार्डाची स्वच्छता राखणे. इ.

ग्रामसेवकाची कामे -

 • गावात आलेल्या शासकीय अधिका-याचे आदरातिथ्य करणे.
 • गावामध्ये सुव्यवस्था ठेवण्यासाठी कार्यक्षम असणे.
 • गावकरी मंडळींना नव-नविन सरकारी योजनांबद्दल मार्गदर्शन करणे. इ.

तलाठीचे कामे -

 • सातबारा उतारा देणे.
 • पंचनामा करणे.
 • रहिवासी दाखला देणे.
 • इतर शेती संबंधी कागदपत्र.
 • जमिन नावे लावणे. इ.

पोलिस पाटीलचे कामे -

 • गावात सु-व्यवस्था ठेवणे.
 • पोलिस पाटील यांचे कडील रहिवासी दाखला देणे. इ.

ग्रामपंचायतीची कामे :

 • गावात रस्ते बांधणे.
 • गावातील रस्त्यांची दुरुस्ती करणे.
 • दिवाबत्तीची सोय करणे.
 • जन्म,मृत्यू व विवाहाची नोंद ठेवणे.
 • सार्वजनिक स्वच्छता ठेवणे.
 • सांडपाण्याची व्यवस्था करणे.
 • पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे.
 • शिक्षण तसेच आरोग्यविषयक सोयी पुरवणे.
 • रोजगार, शेती विकासाच्या व पशुधन सुधारणेच्या योजना अंमलात आणणे.
 • गावाचा बाजार, जत्रा, उत्सव यांची व्यवस्था ठेवणे.

संभाव्य विकास आराखडा :  

 • शेतीसाठी ग्राम ग्रामपंचायतमार्फत एरिगेशन राबविणे.
 • ठिबक सिंचन आणि तुषार जलसिंचन योजना राबवणे.
 • बोअरवेल पुनर्भरण योजना राबविणे.
 • तलाव बांधणे व भूजल पातळी वाढविणे.
 • शेताकडे जाणेसाठी रस्ते तयार करणे.
 • शेतीसाठी न.पा.पु.योजनेसाठी पवनचक्की द्वारे विद्युत निर्मिती करणे.
 • शेतीमाल प्रक्रिया व आंतरराष्ट्रीय बाजारपेठ तयार करणे.
 • घनकचरा निर्मुलन व्यवस्था
 • आरोग्य केंद्र व पशुवैद्यकीय दवाखाना
 • सांडपाणी व्यवस्थेसाठी RCC गटर्स बांधणे.
 • गाव अंतर्गत रस्ते काँक्रिटीकरण करणे.
 • सामाजिक सभागृह बांधणे.
 • ऐतिहासिक बुरुज देखभाल दुरुस्ती करणे.
 • शेतीसाठी सोलर कंपाऊंड बांधणे.
 • शेततळी बांधणे,
 • गावच्या बाहेरून बायपास रस्ते काढणे.
 • गावचा सिटी सर्वे करून आधुनिक पद्धतीने घर, रस्ता, गटर्स व लाईटची सुविधा करणे.
 • पवन उर्जेवर गावची विद्युत वितरण व्यवस्था करणे.
 • देवालयांचा जीर्णोद्धार करणे.
 • शिवकालीन पाणी साठवणे योजनेतून गावातील सर्व घरावरील पाणी साठवणे. 

                

        ग्रामपंचायतीने वैशिष्ट्यपूर्ण राबविलेल्या योजना :

 • सरपंच मानधनातून स्वयंचलित मनोरा घड्याळ.
 • लोकवर्गणीतून स्वयंचलित चालू बंद रस्त्यावरील दिवे.
 • विद्यामंदिर येथे देणगीतून ई.प्रशाला प्रोजेक्ट.
 • ग्रामपंचायतमध्ये देणगीतून सी.सी.टीव्ही कॅमेरे.
 • श्रमदानातून व लोकवर्गणीतून बंधाऱ्यातील गाळ काढणे.
 • राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत जलशुद्धीकरण केंद्र सुरु.
 • लोकवर्गणी व श्रमदानातून लिंगनूरकडे जाणारा रस्ता (प्रा.शाळा) पासून ते कर्नाटक सीमेपर्यंतचा (बायपास) अंदाजे ½ कि.मी. रस्ता झाडे झुडपे काढून मजबुतीकरण करणेत आला आहे.
 • ग्रामनिधीतून सार्वजनिक प्रयोजनाकरिता 6 गुंठे गावठाणातील जागा, न.पा.पु.योजना व जलशुद्धीकरिता 5 गुंठे व जाकवेल करिता 2 गुंठे जागा खरेदी.

 ग्रामपंचायतीस मिळालेले विविध पुरस्कार :

 • जिल्ह्यात अस्पृश्यता निवारण प्रथम क्रमांक सन 1957
 • जिल्ह्यात पहिला ग्रामगौरव सन 1962
 • महाराष्ट्र शासनाकडून महात्मा गांधी जन्म शताब्दी निमित्त प्रथम पारितोषिक सन1969 – 70
 • आदर्श गाव म्हणून तालुक्यात प्रथम क्रमांक सन 1969 – 70
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात द्वितीय क्रमांक सन 2000-01
 • जिल्हापरिषदेचा आदर्श ग्रामसेवक पुरस्कार श्री. बी.ए.खवरे यांना सन 2003-04
 • जिल्ह्यात अस्पृश्यता निवारण आदर्श गांव प्रथम क्रमांक सन 2003-04
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2003-04
 • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2003-04
 • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत सरपंच पुरस्कार श्री. अरविंद शंकर दावणे यांना सन 2004-05
 • केंद्र शासनाचा तालुक्यात प्रथम निर्मल ग्राम पुरस्कार सन 2004-05
 • संपूर्ण स्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हापरिषदेचा तालुक्यातून प्रथम क्रमांक सौ. गीता अरविंद दावणे यांना सन 2007-08
 • महात्मा गांधी तंटामुक्त गाव विशेष पुरस्कार सन 2009 -10
 • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत ग्रामपंचायत पुरस्कार सन 2013-14
 • जिल्हापरिषदेकडून तालुक्यात प्रथम यशवंत सरपंच पुरस्कार सौ.सुप्रिया विजय गुरव यांना सन 2013-14
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2015-16
 • स्वच्छ सुंदर हिरवी शाळा तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2015-16
 • सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी तालुक्यात प्रथम क्रमांक अंगणवाडी क्रमांक 91 सन 2015-16
 • शाहू, फुले, आंबेडकर दलितवस्ती स्वच्छता अभियान तालुक्यात तृतीय सन 2015-16
 • संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्ह्यात प्रथम क्रमांक सन 2015-16
 • तालूक्यात प्रथम I.S.O.मानांकित अंगणवाडी क्र 91 सन 2016-2017
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तालुक्यात प्रथम क्रमांक सन 2016-17
 • स्मार्ट व्हिलेज तालूक्यात प्रथम क्रमांक सन 2016-17
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्संत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धा जिल्ह्यात द्वितीय क्रमांक सन 2016-17
 • संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान तथा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेमधे पूणे विभागात सांडपाणी व्यवस्थापन व पाणी गुणवत्तेचा स्व.वसंतराव नाईक विशेष पुरस्कार सन 2016-17

ADDRESS
HEBBAL JALDYAL Grampanchayat
A/p HEBBAL JALDYAL Tal- Gadhinglaj Dist- Kolhapur
416503

CONTACTS
Phone :7588940733

Office : 02327 – 239165